महाराष्ट्र मुंबई

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

मुंबई | कोरोना व्हायरसमुळे देशात पंतप्रधानांनी लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येकजण आपल्या घरात बसून आहे. घरी आपला वेळ घालवण्यासाठी काहीना काही करत आहे.  लॉकडाऊनमध्ये घरातील वादविवाद वाढत चालले असल्याचं दिसून येत आहे. अशातच एकाला त्याच्या बायकोने लुडोमध्ये हरवल्याने त्याने रागाच्याभरात तिचा पाठीचा कणा मोडला आहे.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये हा प्रकार घडला आहे.  पती पत्नी लुडो खेळत होते आणि त्यामध्ये बायकोने त्याचा पराभव केला. त्यानंतर  चिडलेल्या पतीने रागाच्याभरात तिचा पाठीचा कणाच मोडून टाकला. घडीचा खेळ  हा पत्नीच्या अंगलट आला.

लुडोसारख्या घडीच्या खेळात हरल्याने हा प्रकार घडला. लुडोचा दुसरा डाव खेळता आला असता. पण  सध्या लोकांची माणसीकता किती खालच्या पातळीवर गेली आहे हे या प्रकरणावरून दिसून येतं.

दरम्यान, सरकराने लॉकडाऊन हे आपल्या सुरक्षिततेसाठीच केलं आहे. पण तुम्ही घरू बसूनही असं काही करत असाल तर हे पुर्णपणे चुकीचं आहं. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला घरी वेळ देता येत नाही पण लॉकडाऊनमुळे घरी आहात तर त्याचा चांगल्या गोष्टासाठी फायदा करून घ्यावा.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोप्प नाही; शिवसेनेच्या टीकेला भाजप आमदाराकडून प्रत्युत्तर

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतं पोहचवा; कृषीमंत्र्यांचे आदेश

आजपासून आणखी 5 ठिकाणी कोरोना निदान प्रयोगशाळा

राज्य सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या