मुंबई | सासू-सासऱ्यांपासून वेगळं राहण्याची मागणी करणाऱ्या पत्नीचा निर्घृण खून करून नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे.
घरात सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे अश्विनीने वेगळं घर घेण्याची मागणी पती आकाशकडे केली होती. यातूनच या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती.
अश्विनी आणि आकाश रात्री झोपण्यासाठी जवळच असलेल्या रूपादेवी पाडा क्रमांक दोन येथील रणजित शिरसाठ या नातेवाइकाच्या घरी जात होते. 16 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता ते या घरी झोपण्यासाठी गेले. मात्र तिथे त्यांच्यात वाद झाला.
दुसऱ्या दिवशी बुधवारी रोजी सकाळी 10 वाजले तरी या घरातून काहीच आवाज आला नाही. त्यावेळी त्यांच्या नातेवाइकांनी आणि शेजारच्यांनी या घराच्या मागील बाजूने आत डोकावले. त्यावेळी आकाश एका साडीला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आणि अश्विनी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
थोडक्यात बातम्या-
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना दिलासा
होम क्वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई
“काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला”
हे आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करणार- नाना पटोले
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण!