बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन सुन्न करणारी घटना; पतीचा कोरोनामुळे मृत्यू, पत्नीने उचललं मोठं पाऊल

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील सफीपूरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.

त्रिवेदी कुटुंबातील एका सदस्यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्रिवेदी यांच्या पत्नी अंजली यांनी सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. तसेच नातेवाईकांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशच्या देवासमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. देवासच्या अग्रवाल समाजाचे अध्यक्ष बालकिशन गर्ग यांची पत्नी आणि दोन मुलांचं कोरोनामुळे निधन झालं. मात्र कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू सहन न झाल्याने छोट्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली.

थोडक्यात बातम्या- 

“लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार”

गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणलं, म्हणून आज…- एकनाथ खडसे

कोविशिल्ड लस झाली आणखी स्वस्त; अदर पूनावाला यांनी जारी केले नवे दर

…म्हणून मोफत लसीकरणाबाबतचं ते ट्विट डिलीट केलं; आदित्य ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

‘तो फक्त पोरींचे फोन उचलतो’ म्हणणाऱ्या खडसेंना गिरीश महाजनांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More