गुजरात | गुजरातमधील रहिवासी विनोद पटेल यांनी आपल्या पत्नीला किडनी दान केली आहे. व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य साधून विनोद पटेल हे ऑटोइम्यून किडनी डिस्फंक्शन या आजाराने ग्रासलेल्या त्यांच्या पत्नीला किडनी दान करत आहेत.
मागील तीन वर्षांपासून रिता पटेल या ऑटोइम्यून किडनी डिस्फंक्शन या आजाराचा सामना करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गुजरातमधील अहमदाबाद शहरात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अजूनही त्यांचा किडनीचा आजार पूर्णपणे बरा झालेला नाही. अहमदाबादचे डॉक्टर सिद्धार्थ मवानी यांच्या माहितीनुसार ऑटो इम्यून या आजाराचा व्यक्तीच्या अवयवांवर गंभीर परिणाम होतो. यामुळेच रिता यांची किडणी खराब झाली आहे. पत्नीच्या वेदना पाहून मी तिला माझी किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे.
विनोद पटेल यांच्या तपासणीमधीन पती विनोद यांची किडणी पूर्णपणे व्यवस्थित लावली जाऊ शकते हे स्पष्ट झालं. म्हणून विनोद यांनी 14 फेब्रुवारीला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी किडणी दान केली आहे.
दरम्यान, प्रत्येकानं आपल्या पार्टनरची काळजी घ्यायला हवी, गरज पडल्यानंतर एकमेकांच्या मदतीसाठी उभं राहायला हवं, असं मत यावेळी विनोद पटेल यांनी व्यक्त केलं. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पतीने पत्नीला जिवनदान दिलं या गोष्टीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
घरकाम करणाऱ्या तरूणीसोबत पोलीस अधिकाऱ्याने केलं हे धक्कादायक कृत्य
“प्रियंका गांधी दुर्गेचा अवतार, त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार”
तो मरता मरता वाचला, म्हणतो टाटानेच केला चमत्कार!
“माझी सत्ता, माझी मनमानी असा राज्य सरकारचा कारभार चाललाय”
टिकटाॅक युजर्ससाठी खूशखबर, भारतात टिकटाॅक पुन्हा होणार सुरू??