बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाधित पत्नीला कोविड सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी पतीने लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

मिझोरम | आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, कोरोना रोग हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोना झालेल्या रूग्णांपासून आपण काही अंतर लांब राहिले पाहिजे. तसेच सध्या कोरोना रूग्णांची संख्य दिवसेंदवस वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही याचा ताण आल्याचं दिसून येतं आहे.

या काळात सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामधील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. अशातच सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ खूप मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीला कोरोना कोविंड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.

व्हिडीओमधील व्यक्तीच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याचं समजतं आहे. एका जीपला मागच्या बाजूने ट्रॅक्टरची एक ट्रॉली लावली आहे. त्या ट्रॉलीमध्ये त्या महिलेला बसण्यासाठी खुर्चीही ठेवली आहे. त्यानंतर ती महिला त्या ट्रॉलीत चढून त्या ठिकाणी असलेल्या खुर्चीमध्ये बसते. जोपर्यंत ती महिला व्यवस्थित बसत नाही, तोपर्यंत तिचा पती तिथेच लांब उभा राहतो.

त्यानंतर तो आपल्या पत्नीला घेऊन जातो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो व्यक्ती ज्याप्रकारे आपल्या पत्नीची तसेच एका कोविड पॉझिटीव्ह पेशन्टशी ज्या पद्धतीने ट्रिट करत आहे. ते पाहून अनेकांनी त्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. तसेच हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला असून, या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंट्सही येत आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

मास्कच्या नावाखाली विकत होता स्टेशनरी; प्रशासनाने कारवाई केली अन् तो थेट गाडीखाली झोपला

पुण्यात दस्त नोंदणींबाबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आली समोर

सेक्स रॅकेटमध्ये सहभागी व्हायला ‘या’ कारणामुळे तयार झाल्या अभिनेत्री, धक्कादायक माहिती

‘…अन्यथा तुला जीवंत सोडणार नाही’; पुण्यात स्पीड पोस्टद्वारे खंडणीची मागणी

…म्हणून मोदी ‘त्या’ विद्यार्थ्याला म्हणाले, “तुम्हाला भविष्य समजते का?”

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More