बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीच्या चारित्र्यावर पतीला आला संशय अन् घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

जयपूर | राजस्थानमधील दुधवाखारा येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने आपल्या पत्नीचीच हत्या केली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तपास करताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

दुधवाखारा येथील लादडिया या गावातील ही घटना आहे. या घटनेबाबतची माहिती देत संबंधित मृत महिलेच्या वडिलांनी तक्रार नोंदवली आहे. संबंधित वडिलांचं नाव शिवलाल असं आहे. शिवलाल यांच्या मुलीचा विवाह 15 वर्षांपुर्वी अमिलाल नावाच्या एका व्यक्तीसोबत झाला होता.

दरम्यान, लग्नाच्या काही काळानंतर अमिलाल त्याच्या पत्नीशी दिवसभर भांडण करायचा. भांडणाला वैतागून संबंधित पत्नी तिच्या माहेरी गेली असता 23 मे रोजी ती तिच्या सासरी परतली. त्यानंतर 25 मे रोजी सकाळी अमिलालने आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिची हत्या केली.

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित मृत महिलेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात आले आहेत. तसेच दुधवाखारा सीएचसी येथील मेडिकल बोर्डाने मृतदेहाचे शवविच्छेदन केलं असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

बापरे! मानवी वस्तीमध्ये आला ‘हा’ भला मोठा प्राणी…, पाहा व्हिडीओ

लग्नात मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण दमला; रिकाम्यावेळात नवरा-नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

‘रोहितने केलेल्या चूका तू करु नको’; भारताच्या ‘या’ मोठ्या माजी खेळाडूचा ऋषभ पंतला सल्ला

‘सर माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?’; नेटकऱ्याला मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

मुलगी हवी होती, मुलगा झाला; रागाच्या तडाख्यात दगडावर आपटून हैवान बापाकडून मुलाची हत्या!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More