मुंबई | पत्नीने गावी जाण्यास नकार दिला म्हणून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे.
पत्नीच्या हत्येची माहीती स्वत:हून पोलीसांना देत पती त्यांच्या स्वाधीन झाला. त्याच्याविरोधात टिळकनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
शिवकुमार यादव हा पत्नी मनिषा आणि दोन मुलांसह डोंबिवली पूर्वेतील शेलारनाका परिसरात मोहन चाळीत राहत होता. त्यांना एक 18 वर्षाचा तर दुसरा 11 वर्षाचा मुलगा आहे.
पत्नी मनिषा ही गावी जाण्यासाठी नकार देत होती. याचा राग आल्याने शिवकुमार याने घरातील चाकू घेऊन पत्नी मनिषाच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
थोडक्यात बातम्या-
…त्यासाठी राज ठाकरेंना आम्ही नक्की मार्गदर्शन करू- संजय राऊत
“आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?”
सिंघू बॉर्डरवर स्थानिक-शेतकऱ्यांमध्ये दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार
“राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी आलो आणि अडकलो, बाहेरही पडता येईना “
अखेर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय