बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन घरातच पुरला मृतदेह, चिमुकलीला धमकी, पाहा व्हिडीओ

मुंबई | मुंबई येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असणारे रहिश शेख यांचा 2012 साली एका तरुणीसोबत विवाह झाला होता. त्यानंतर संबंधित तरुणी लग्नानंतर एका मुलाच्या प्रेमात पडली. यातूनच तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरातच पुरला. मात्र तिच्याच मुलीने हे सर्व रहस्य उघडकीस आणलं आहे.

संबंधित जोडपं उत्तर प्रदेशमधून मुंबई येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. यादरम्यान रहिश यांची पत्नी शेजारी राहणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात पडली. संबंधित पत्नीचं नाव शाहिदा असं असून तिच्या प्रियकराचं नाव अनिकेत असं आहे. आपल्या पत्नीच्या प्रेमसंबंधांबद्दलची माहिती रहिश यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याला विरोध केला. अशातच एकदा अनिकेत आणि शाहिदा अनैतिक संबंध ठेवत असताना रहिश अचानक घरात आला.

रहिश घरात येताच शाहिदा आणि अनिकेतने मिळून रहिश यांचा गळा चिरला आणि त्यांचे चार तुकडे करुन स्वयंपाक घरात पुरले. यावेळी शाहिदा आणि रहिश यांची मुलगी देखील तिथे होती. तसेच जर कोणाला काही सांगितलं तर बापाला जसं गाडलं तसंच तुला देखील गाडेल, अशी धमकी शाहिदाने तिच्या मुलीला दिली होती.

दरम्यान, रहिश यांचा भाऊ मुंबईला आला असताना रहिश यांच्या 6 वर्षाच्या मुलीने त्यांना संपुर्ण प्रकरण सांगितलं. यानंतर रहिश यांच्या भावाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी चालू केली आणि शाहिदा हिला अटक केली. मात्र तिचा प्रियकर अनिकेत हा फरार आहे.

थोडक्यात बातम्या-

नागपूरात काळ्या बुरशीचं थैमान सुरूच; मृत्युच्या आकड्याचं शतक

मोठी बातमी! मुंबईत कोरोनावर उपयुक्त औषधांचा कोट्यवधींचा बनावट साठा जप्त

लेकरांना बंधाऱ्यात फेकून आई फरार, धक्कादायक कारण आलं समोर

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या आत

“आमचा ‘राजा’ तुमच्या राजासारखा खोटं बोलत नाही”; गडकरींचा जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचं उत्तर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More