बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् भर कार्यक्रमात पुरूषाने चक्क गव्हर्नरच्या कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

अजरबैजान | कोरोना महामारीवर उपचार म्हणून जगभरात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. प्रत्येक देशातील सरकार लवकरात लवकर लसीकरण पार पाडण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. कोरोना लस ही लसीकरण केंद्रावरील उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दिली जाते. पण कधीकधी कोरोना लस देण्यावरून मोठा गोंधळ निर्माण होवू शकतो. असाच गोंधळ अजरबैजानमध्ये झाला आहे.

पत्नीला पुरूष डाॅक्टरनं लस दिल्याच्या रागातून एका व्यक्तीनं अजरबैजानचे गव्हर्नर अबेदिन खोर्रम यांना सार्वजनिक कार्यक्रमात कानशिलात लगावली आहे. खोर्रम यांच्यावर हा हल्ला राजकीय विचारातून केल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. या घटनेचे पुर्ण इराणमध्ये पडसाद उमटलं आहेत. या घटनेनंतर सर्वत्र सोशल मीडियावर चापट मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कानशिलात मारल्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्यानं धक्कादायक खुलासा केला आहे. माझ्या पत्नीला पुरूष डाॅक्टरनं लस दिल्याच्या रागातून मी हे कृत्य केल्याचा खुलासा त्या व्यक्तीनं केला आहे. हल्ला केलेली व्यक्ती सैन्यदलातील माजी सदस्य आहे. सध्या तो सक्रिय राजकारणात उतरला आहे. परिणामी त्याचा हा हल्ला राजकीय उद्देशानं प्रेरित होता, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, अजरबैजान प्रांतात घडलेल्या या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली आहे. प्रसिद्ध न्यूज एजन्सी इराण इंटरनॅशनल इंग्लिशनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरन हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. परिणामी अवघ्या जगात सध्या या व्हिडीओची आणि कानशिलात मारणाऱ्या व्यक्तीची चर्चा होत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या  

सुपरस्टार रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; वाचा चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी

लेकाची कामगिरी पाहून बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ

पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव अन् सांगलीत टीव्ही फोडला; पाहा व्हिडीओ

..अन् अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी भागवत कराड उतरले डाॅक्टरांच्या भूमिकेत

‘पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार’, धोनीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More