बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणाने नवऱ्यानेच तिचा अश्लिल व्हिडीओ काढुन केला सोशल मिडियावर व्हायरल

नागपूर | नवऱ्यानेच आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून तो फेसबुकवर व्हायरल केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. या घृणास्पद प्रकारामुळे नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असतं, पण विश्वासाला तडा गेल्यास त्यात कोणताही रस उरत नाही. असंच काहीसं या प्रकरणात घडलं आहे.

सुरेश लक्ष्मीचंद सुमन असं आरोपीचं नाव असून त्याने आपल्या पत्नीशी पटत नसल्याने बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्यावरून आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ व फोटो अपलोड करायला सुरुवात केली. आरोपी आपल्या पत्नीसोबत राजस्थानमधील कोटा येथे राहत होता. परंतु सारखे भांडण होत असल्याने पत्नी त्याला सोडुन नागपूर येथे राहायला आली.

सुरेशची पत्नी नागपूरला राहायला आल्यानंतर त्याने बनावट फेसबुक अकाउंट बनवून हा घाणेरडा प्रकार सुरू केला आणि एवढंच नाही तर स्वतःच्या पत्नीबरोबरच तिच्या मित्रमैत्रिणींचे ही काही फोटो त्याने या बनावट अकाउंटवरून व्हायरल केले. संबंधित प्रकार हा 17 जानेवारी ते 3 एप्रिल दरम्यान घडत होता.

काही दिवसांपूर्वी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याच्या पत्नीने नागपुरमधील यशोदानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी 37 वर्षाच्या सुरेश लक्ष्मीचंद सुमन या इसमाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणात पत्नीशी पटत नसल्याने तिची बदनामी करण्याच्या हेतूने सुरेशने हे घाणेरडं कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या नियमांना शिवसैनिकाकडुनच केराची टोपली; झाली ‘ही’ कारवाई

चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; काल दिवसभरात आढळले इतके रूग्ण

कामगाराला कोरोना झाल्यास…; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारचा ‘हा’ नवा नियम

महाराष्ट्राच्या लॉकडाऊनबद्दल अजित पवारांचं मोठं वक्तव्य

गर्लफ्रेंडनं आपल्याच बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्… अत्यंत धक्कादायक घटनेनं खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More