बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवऱ्यानं केली नसबंदी, त्यानंतर पत्नी प्रेग्नंट राहिल्यानं छळ, तपासात धक्कादायक माहिती समोर

जयपूर | राजस्थानमधील अजमेर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने नसबंदी केल्यानंतर देखील पत्नी गरोदर राहिल्यानं संपुर्ण कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यातूनच सासरच्या मंडळींनी महिलेचा छळ करण्यास सुरूवात केली. याबाबतचा तपास केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अजमेर येथे रहिवासी असणाऱ्या संबंधित पतीने 4 महिन्यांपुर्वी नसबंदी केली होती. मात्र, तरीसुद्धा त्याची पत्नी गरोदर राहिली. पत्नी गरोदर झाल्यावर पतीने डाॅक्टरांकडे धाव घेतली. यादरम्यान त्यांची नसबंदी यशस्वी झाली असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.

डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे यशस्वीपणे नसबंदी करुन देखील पत्नी गरोदर झाल्याचं पाहून पतीच्या कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या कारणामुळे संबंधित महिलेच्या सासरच्यांनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली. त्रासाला कंटाळून संबंधित पत्नीने या सर्व प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी आरती डोगरा यांना माहिती दिली. त्यानंतर याबाबतचा तपास करण्यास सुरूवात झाली.

दरम्यान, आरोग्य अधिकारी डाॅ. के.के. सोनी यांना आरती यांनी फोन करुन याबाबतची माहिती विचारली. यादरम्यान, धक्कादायक सत्य समोर आलं आहे.  डाॅ. भगवान सिंह यांनी केलेली ती नसबंदी अयशस्वी झाली असून 100 केसेसमध्ये एक नसबंदी अयशस्वी होत असल्याचा खुलासा डाॅ.सोनी यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

झाडं लावून झाडांच्या मुळांशी अस्थीविसर्जन, वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी मुलीचा स्तुत्य निर्णय

‘तुम्ही भारताची जी निंदा करताय त्यानं मला रडू येतंय’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचं भारत प्रेम

DRDO चं ‘हे’ ॲंन्टी कोव्हिड औषध आजपासून बाजारात उपलब्ध शास्त्रज्ञ म्हणाले…

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाला…

‘या’ कंपनीकडून ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज; कोरोनाकाळात ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More