झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर उकळतं तेल ओतलं, पत्नीला अटक

पुणे | झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर पत्नीनंच गरम तेल ओतल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वानवडीमध्ये घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी जया शेरसियाला अटक केलीय.

भरत आणि जयाची सहा वर्षांपूर्वी मुंबई-पुणे रेल्वे प्रवासात ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. मुंबईला कामाला असलेला भरत त्यानंतर महिन्यातून एकदा पत्नीला भेटण्यासाठी पुण्याला येत असे.

शनिवारी भरत पुण्यात आला, त्यावेळी दारु पिल्यानंतर दोघांचं भांडण झालं. रात्री भरत झोपेत असताना जयानं त्याच्यावर उकळतं तेल ओतलं. यात तो १० टक्के भाजला आहे.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या