बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पॉर्न पाहण्यासाठी पती टाकायचा दबाव, पत्नीने केलं असं काही की…

मेरठ | पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कारणांवरुन होणारे वाद ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. मात्र, सध्या मेरठ मधील एका जोडप्याच्या वादाचं कारण ऐकून सर्वजण शॉक झाले आहेत. पॉर्न पाहण्यावरुन मेरठ मधील एका जोडप्यात वाद लागला. हा वाद थेट घटस्फोटापर्यंतच्या मुद्यावर येऊन पोहोचला. यानंतर कौटुंबिक समुपदेशन केंद्राने या दोघांची समजूत काढत हा वाद मिटवला.

मेरठच्या इंचोली भागात राहणाऱ्या एका नवविवाहीत तरुणीने आपल्या सासरच्या मंडळींवर हुंडा मागत असल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. तसेच या तरुणीने आपला पती आपल्याला मारहाण आणि शारीरिक शोषण करत असल्याचा देखील आरोप केला. यानंतर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवण्यात आलं.

यावेळी जोडप्याचं वेगवेगळ्या मुद्यांवर समुपदेशन करण्यात आलं. मात्र, समुपदेशनावेळी जोडप्यातील वादाचं एक वेगळंच कारण समोर आलं. पती बेडरुममध्ये पॉर्न फिल्म्स पाहायचा तसेच पत्नीला देखील पॉर्न पाहण्यासाठी जबरदस्ती करायचा, अशी माहिती समुपदेशनावेळी समोर आली.

पत्नी ज्यावेळी पतीला विरोध करायची तेव्हा पत्नी तिला मारहाण करायचा. तसेच तिचा मानसिक छळ देखील करायचा. समुपदेशानंतर पतीने जर पॉर्न पाहण्याची सवय सोडून दिली तरच आपण पतीसोबत सासरी जाऊ, अशी मागणी पिडीतेने केली होती. यानंतर पती आणि पत्नी यांच्यात बेडरुममध्ये मोबाईल बॅन असेल, असा करार झाला आहे.

थोडक्यात बातम्या –

आनंदाची बातमी! कोरोना लढ्यात भारतामध्ये आणखी एका लसीला मान्यता, केंद्रीय आरोग्य मंत्र्याची घोषणा!

“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल…”

“चंद्रकांत पाटील अतिशय चांगलं काम करत आहेत, दिल्ली हाय कमांड त्यांच्या पाठीशी”

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; कार्टानं याचिका फेटाळली

मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात गॅस गळती; रूग्णांना तातडीनं बाहेर काढलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More