बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गरज पडल्यास संपर्क साधा’; मोबाईल नंबर देत नवऱ्याने गावात स्वत:च्याच बायकोचे लावले पोस्टर्स

बुलडाणा  | नवऱ्याने गावात पत्नीचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चिखली तालुक्यात घडली असून याबाबत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बायको घटस्फोट देत नसल्याने चक्क सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्याच बायकोचे पोस्टर्स लावून त्यावर गरज पडल्यास संपर्क साधा, असं लिहिलं आहे. तसेच काही मोबाईल क्रमांकही यावर दिले असल्याचं कळतंय.

समाधान निकाळजे नामक आरोपीने हा प्रताप केला असून महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसात आरोपी विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणी महिलेच्या भावाने या आरोपीसोबत फोनवर चर्चा केली असता चिखली तालुक्यात आरोपीने पोस्टर्स लावले असल्याची माहिती आहे.

दरम्यान, घटस्फोट नाही दिला तर बायकोची बहीण व सासूचे सुद्धा पोस्टर्स लावून बदनामी करण्याची धमकी या विकृत आरोपीने दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद दाखवून देऊ; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

स्टंट करत गाडीवरच सुरू झाला रोमान्स अन्…, पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त टीका केल्याप्रकरणी कारवाई झालेल्या तरूणाने वाझेंबाबत केला खळबळजनक दावा!

13 तासांच्या झडतीनंतर सचिन वाझे यांना NIA ने ठोकल्या बेड्या

मला कडक लॉकडाऊन लावण्यास भाग पडू नका- उद्धव ठाकरे 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More