उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशच्या मेरठमधील ब्रह्मपुरी परिसरात एका महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं आहे.
महिला हरीनगरमधील आपल्या कुटुंबीयांसोबत राहात असून, तिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता. महिलेचा पती दिल्लीत नोकरी करत असून, महिलेचे लग्न होऊनही गेल्या अनेक वर्षांपासून महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. महिलेचे अन्य तरुणाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन होता प्रियकराने तिची हत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे.
महिलेचे अन्य एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने आरोपी तिच्या घरात घुसला आणि तिची गळा चिरून हत्या केली.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपीला अटक केली.
दरम्यान, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून,या घटनेमुळं संपूर्ण कुटुंब हादरुन गेलं आहे.
थोडक्यात बातम्या-
2020 पेक्षा 2021 जास्त धोकादायक असेल?; WHOनं दिला ‘हा’ मोठा इशारा
कोरोनात तुमची नोकरी गेलीय का?; अशाप्रकारे सरकारकडून मिळवा ३ महिन्यांचा ५० टक्के पगार!
शेजारील विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी त्यानं चक्क बोगदा खोदला; त्यानंतर…
रिया चक्रवतीच्या चाहत्यांसाठी नव्या वर्षात गुडन्यूज!
राम शिंदेंना विकासाचं काम कळत नसेल त्यांना गट-तट कळत असेल- रोहित पवार