Husband-Wife Argument | रशियातील (Russia) एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबतचे संबंध सुधारण्यासाठी आणि वैवाहिक जीवन टिकवण्यासाठी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) निमित्त एक महागडी भेट दिली. मात्र पत्नीने ही भेट नाकारल्याने त्याने ती भेट कचऱ्यात फेकून दिली.
लाखोंची भेट वस्तू
पत्नीसोबतचा तणाव कमी करण्यासाठी आणि विवाह टिकवण्यासाठी पतीने पत्नीला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी पोर्शे मकॅन (Porsche Macan) ही अलिशान कार भेट दिली होती.
परंतु पत्नीने ही भेट स्वीकारण्यास नकार दिला. पत्नीने भेट नाकारल्याने संतप्त झालेल्या पतीने, ती कार थेट कचराकुंडीत टाकून दिली. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. (Husband-Wife Argument)
कार कचराकुंडीत
पतीने दिलेली भेट नाकारल्यामुळे त्याचे परिणाम काय होऊ शकते, याचे हे उदाहरण आहे. पत्नीने महागडी कार नाकारल्याने पतीने ती कचऱ्यात फेकून दिली.
सदर घटना रशियामध्ये घडली असून, या घटनेमुळे पती-पत्नीमधील नातेसंबंधांमधील तणाव आणि गैरसमज यावर प्रकाश पडतो. महागड्या भेटवस्तू देऊन नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होतो.
Title : Husband-Wife Argument Russian Man Throws Away Expensive Car