मुंबई | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या गंभीर आरोपांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र अशातच काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे.
धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता, असं माजी खासदार आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई म्हटलं आहे. चिपळूनमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तूर्तास राजीनामा घेणार नसल्याचं सांगितलं होतं. हे प्रकरण पोलिसांकडे आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही पवार म्हणाले होते. त्यानंतर तक्रारदार तरूणीने पुन्हा एकदा समोर येत माध्यमाला मुलाखत देत मुंडेंवर आरोप केले होते.
दरम्यान, धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ होते. ते व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवत असल्याचं रेणू शर्माने म्हटलं होतं.
थोडक्यात बातम्या-
शार्दुल आणि वाशिंग्टनने केली कांगारूंची बोलती बंद! सुंदरने केला 110 वर्षानंतर ‘सुंदर’ विक्रम
‘बिग बॉस14’ मधील पिस्ता धाकडचा व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून मृत
“महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा”
“योगी आदित्यनाथ यांना माझ्यापेक्षा उत्तम मुख्यमंत्री मानतो