Top News

100 जणांना वाढदिवसाची पार्टी देणाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

हैद्राबाद | हैदराबादमधील एका व्यक्तीनं वाढदिवसाचा जंगी समारंभ केला होता. वाढदिवसाची पार्टी देणाऱ्या त्या व्यक्तीचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. या वाढदिवसाला जवळपास 100 जणांची उपस्थिती होती. सोन्याच्या व्यापाऱ्यानं आपल्या वाढदिवसाला 100 लोकांना आमंत्रित केलं होतं.

या व्यक्तीचा आणि वाढदिवसाला उपस्थित असणाऱ्या अन्य एका व्यक्तीचा शनिवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे वाढदिवसाला उपस्थित असणाऱ्यांची चिंता वाढली आहे. सर्वजण आपली करोना चाचणी करण्यासाठी हैदराबादमधील खासगी रुग्णालयात गेले आहेत.

हैदराबादमधील आरोग्य आधिकाऱ्यांना असा संशय आहे की वाढदिवसाची पार्टी देणाऱ्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचं हैदराबादमधील हिमायतनगर परिसरात सोन्याचं दुकान आहे.

दरम्यान, या व्यक्तीच्या वाढदिवसाला ज्वेलर्स असोसिएशनमधील 100जणांची उपस्थिती होती. वाढदिवसाची पार्टी दिल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे दिसली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

BSNL चा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन; दररोज मिळणार 5 जीबी डेटा

पंकजा मुंडे यांना केंद्रात ‘हे’ पद मिळण्याची शक्यता!

महत्वाच्या बातम्या-

‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल- अनिल परब

वाट्टेल ती किंमत मोजून ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण …- संजय राऊत

कोरोना संशयित रूग्णाचा मृतदेह तब्बल ३ तास एसटी आगारात पडला, लाजीरवाणं कृत्य…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या