Hyundai Exter CNG l बजेटमध्ये बसेल, मायलेजमध्ये बेस्ट आणि सेफ्टीमध्ये सॉलिड – अशी कार हवी आहे का? तर Hyundai Exter CNG ही SUV तुमच्यासाठी एकदम योग्य पर्याय ठरू शकते. नुकतीच लाँच झालेली ही सीएनजी कार मध्यमवर्गीयांसाठी खिशाला परवडणारी आणि फॅमिली फ्रेंडली आहे.
या कारची शोरूम किंमत 7.50 लाख रुपये, तर ऑन रोड किंमत सुमारे 8.44 लाख रुपये (दिल्ली/मुंबई) आहे. सर्वसामान्य पगारदार वर्गासाठी सुलभ फाइनान्स प्लान उपलब्ध आहे, ज्यामुळे 30 हजार रुपये महिन्याला कमावणारेही ही कार सहज घेऊ शकतात.
EMI किती पडणार? कमी डाऊन पेमेंटमध्ये गाडी तुमची :
जर तुम्ही 2 लाख रुपये डाऊन पेमेंट भरू शकत असाल, तर बँकेतून तुम्हाला 6.44 लाख रुपयांचं कर्ज घ्यावं लागेल. 9.5% व्याजदर आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलेल्या कर्जावर EMI सुमारे 13,500 रुपये प्रति महिना पडेल. (Hyundai Exter CNG)
या पद्धतीने 5 वर्षांत बँकेला एकूण 8.11 लाख रुपये परतफेड करावी लागेल. अर्थात, व्याजदर, EMI आणि डाउन पेमेंट हे तुमच्या क्रेडिट स्कोअर, बँक आणि शहरानुसार बदलू शकतात.
Hyundai Exter CNG l फीचर्स इतके जबरदस्त की महागड्या कारलाही मागे टाकेल! :
Hyundai Exter CNG मध्ये 6 एअरबॅग्स, 3 पॉइंट सीट बेल्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, सेंट्रल लॉकिंग, आणि मॉडर्न सिक्युरिटी फीचर्स मिळतात. या सेगमेंटमध्ये अशा सुविधा दुर्मिळ आहेत. त्यामुळे ही SUV फक्त परवडणारीच नव्हे तर सुरक्षिततेचाही विचार करणारी कार ठरते.
कारमध्ये 1.2 लिटर 4-सिलिंडर इंजिन असून, ते CNG फ्युएलवर 27.1 किमी/किलो पर्यंतचा मायलेज देऊ शकतं. ड्युअल सिलिंडर टेक्नोलॉजी आणि 391 लिटर बूट स्पेससारखी वैशिष्ट्यं ही कार आणखी उपयुक्त ठरवतात.