बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कार प्रेमींसाठी जबरदस्त बातमी, ‘ही’ जबरदस्त गाडी लवकरच लाँच होणार!

नवी दिल्ली | नव्या आर्थिक वर्षात अनेक कार कंपन्या बाजारात नव नव्या कार विक्रीसाठी आणत आहे. तशातच आता ह्युंडाई कार कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एन लाईन सीरिजमधील पहिली कार ऑगस्ट मध्ये लाँन्च करण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आय 20 एन लाईन 24 ऑगस्टला भारतात दाखल होईल. तर सप्टेंबर महिन्यात कारच्या किंमतीबाबत खुलासा केला आहे.

कारच्या बाबतीत कार चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसुन येत आहे.  भारतात कंपनीच्या काही डीलरशिप्समध्ये 25 हजारांच्या टोकन किमतीवर आय ट्वेंटी एन लाइन साठी लाँचच्या आधीच बुकिंग चालू केलं आहे. ह्युंडाई कंपनी एन लाईन अंतर्गत आय ट्वेंटी चे तीन प्रकार एन सहा आय एम टी, एन आठ आय एम टी आणि एन आठ डीसीटी भारताच्या बाजारात उतरवेल. हे सगळे प्रकार स्पोर्टी डिझाइन आणि नविनतम वैशिष्ट्यांसह येतील.

आय ट्वेंटी लाइन च्या दिसण्याबाबतीत खुपच जबरदस्त आहे. कारमध्ये 17 इंचाचे अलॉच व्हिल्स असतील. कारच्या रिअरमध्ये टॉपवर रूफ मांउटेड स्पॉयलर आणि शार्क फिन अँटिना असेल. तर झेड- साईच्या रॅपच्या भोवती टेल लाइट आणि दोन एक्झॉस्टमुळे ही कार अजूनच प्रीमियम आणि स्पोर्टी दिसते. शिवाय यामध्ये स्कल्प्टेड बोनटसह स्लोपिंग रूपलाइन, मोठी ब्लॅक्ड आउट ग्रिल आणि मागच्या बाजूला आकर्षक हेडलॅंप्स असुुन कारमध्ये ब्लॅक्ड आउट बी पीलर आणि ओआरवोएस मिळेल. यी पाच लोकं बसतील अशा कारमध्ये मोठे केबिन असणार आहे. तसेच त्या कारमध्ये 3 स्पोक मल्टी- फंक्शनल लेदर स्टीअरिंग असणार आहे. मनोरंजनासाठी टेक्नॉलॉजीसह 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट पॅनल आहे.  सुरक्षासाठी कारमध्ये मल्टिपल एअरबॅग आणि एडीएएस असणार आहे.

दरम्यान, आय ट्वेंटी एन लाइनमध्ये 1.0 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनचा वापर असणार आहे.172 एनएम पीक टॉर्कवर 118एचपी जनरेट ह्या कारचं इंजीन करणार आहे. अशातच सहा वेग आयएमटी आणि सात वेग डीसीटी असे दोन ट्रान्समिशन पर्याय असणार आहे. या कारची किंमत 11 ते 12 लाख रूपयांच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

अबब… गाड्या विकता की केसावर फुगे??? ‘या’ कंपनीनं एका दिवसात विकल्या 1 लाख गाड्या!

होंडाचा सर्वात मोठा धमाका, सर्वात स्वस्त कार होणार लाँच, फक्त 5 हजार रुपयात!

मोठी बातमी! सुवर्णपदकवीर नीरज चोप्रा रूग्णालयात दाखल, तब्येत पुन्हा बिघडली!

‘नवरा मुर्ख वाटायला लागतो’, पाहा भन्नाट मराठी कविता

देशातील 10 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप 5 मध्ये!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More