ह्युंदाई कंपनीची ‘ही’ इलेक्ट्रिक कार मार्केटमधून बंद होणार

Hyundai Electric Car

Hyundai Electric Car l ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीने भारतीय बाजारपेठेतील त्यांची एक इलेक्ट्रिक कार बंद केली आहे. कंपनीने ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार मार्केटमधून बंद केली आहे. तसेच ही इलेक्ट्रिक कार Hyundai India च्या वेबसाईटवरून देखील हटवण्यात आली आहे. Hyundai ने कोना इलेक्ट्रिकला बाजारात कधीही अपडेट केले नाही आणि Hyundai ची ती पहिली इलेक्ट्रिक कार होती, जी कंपनीने भारतीय बाजारात आणली आहे.

Creta EV 2025 मध्ये येणार? :

Hyundai India कंपनीने जानेवारी 2025 मध्ये त्यांचे पहिले मास मार्केट इलेक्ट्रिक वाहन लाँच करणार आहे. ही कार क्रेटाची इलेक्ट्रीफाईड आवृत्ती असू शकते आणि ही कार कंपनीच्या तामिळनाडू कारखान्यात तयार केली जाऊ शकते.

कंपनी प्रथम Hyundai ची Creta EV लाँच करेल अशी अपेक्षा आहे, कारण या कारची ICE आवृत्ती भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय SUV पैकी एक आहे. Hyundai ने अद्याप Creta EV च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. पण ही कार सिंगल चार्जिंगमध्ये सुमारे 400 ते 500 किलोमीटरची रेंज देऊ शकते.

Hyundai Electric Car l किंमत किती असणार? :

मारुती सुझुकीच्या आगामी इलेक्ट्रिक कार eVX मध्येही तुम्ही हीच श्रेणी पाहू शकता. मारुतीची इलेक्ट्रिक कार सुमारे 550 किलोमीटरच्या रेंजसह येऊ शकते. या कारणामुळे कंपनीने ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कार मार्केटमधून बंद केली आहे.

Creta EV ने भारतीय बाजारपेठेत लाँच होणाऱ्या अनेक इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करू शकते. ही कार MG ZS EV, Tata Curve, Maruti Suzuki eVX, BYD Atto 3 आणि Mahindra XUV400 ला टक्कर देऊ शकते. Hyundai च्या या EV ची किंमत 20 लाख ते 30 लाख रुपये असू शकते.

News Title – Hyundai Kona Electric Discontinued

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना मिळाला मोठा पुरावा!

अगदी वरचा देव जरी आला तरी… उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड

ओबीसी समाजाची बैठक ‘मॅनेज’ होती; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

ओबीसींसाठी महत्वाचा दिवस; लक्ष्मण हाकेंच्या भेटीला ‘हे’ मोठे मंत्री जाणार

या राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .