Hyundai vs Maruti | ह्युंदाईची ही छोटी कार मारुतीला देणार टक्कर?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या देशात एसयूव्ही कारची(SUV Car) मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळं गाड्या बनवणाऱ्या कंपन्याही आता नवनवीन फीचर्स असलेल्या गाड्या लाॅंच करत आहेत.

सध्या ग्राहकांचा कल छोट्या दिसणाऱ्या स्पोर्टी कार खरेदी करण्याकडं आहे. जर तुम्हीही स्पोर्टी कार आणि तिही कमीत कमी किंमतीत घेण्याच्या विचारात असाल तर पुढील माहिती तुमच्या फायद्याची ठरू शकते.

Hyundai Grand i10 Nios ही एक उत्तत फीचर्स असलेली नुकतीच लाॅंच झालेली एसयूव्ही कार आहे. या कारचे मायलेज २० किमी आहे तर सीएनजी माॅडेलमधील मायलेज 28 केएमपीएल आहे.

विशेष म्हणजे या कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबाॅक्सचा ऑप्शनही आहे. या गाडीत सुरक्षेच्या दृष्टीनंही अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. पार्किंग असिस्ट, हिल असिस्ट, एअरबॅग्ज, बर्गलर अलार्म अशी अनेक खास वैशिष्ट्ये या कारमध्ये आहेत.

फोन चार्जिंगसाठी टाईप सी चार्जिंग पोर्ट, वायरलेस चार्जिंग, कूल्ड ग्लोव्ह बाॅक्स अशा सुविधाही या कारमध्ये आहेत. या कारची किंमत 10 लाखापर्यंत आहे.

महत्वाच्या बातम्या-