Top News औरंगाबाद महाराष्ट्र

….म्हणून मी हाडाचा शेतकरी आहे बनावट नाही- रावसाहेब दानवे

औरंगाबाद |  शेतकरी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवेंवर मोठ्या प्रमाणात टीका झालेली पाहायला मिळाली. यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्रातला मंत्री असलो तरी गाईचं दुध काढतो, गाडी हाकतो आणि बैलही धुतो याचा अर्थ मी बनावट शेतकरी नाही तर हाडाचा शेतकरी असल्याचं दानवेंनी म्हटलं आहे. दानवेंनी माफी मागावी अशी मागणी होत होती मात्र दानवेंनी माफी मागितली नाही.

मला असं वाटतं शेतकऱ्याची विटंबना मीच काय कोणीच करू शकत नाही. पण एखाद्या बोलण्याचा विपर्यास बातमीमुळे होत असेल तर माझा नाईलाज आहे. शेतीच्या क्षेत्रात ज्या माणासाने जन्म घेतला तो शेतकरी विरोधी वक्तव्य करू शकत नाही, असं दानवे म्हणाले.

दरम्यान, राजधीन दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य दानवेंनी केलं होतं. दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.

थोडक्यात बातम्या-

“भाजपने मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समाजाची दिशाभूल करणे थांबवावं”

“भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचा सिंहाचा वाटा”

“चांगल्या कामात केंद्र सरकारचं मांजर का आडवं जातं?”

…तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल- संजय राऊत

मी ऊसतोड कामगाराचाच मुलगा, ऊसतोड कामगारांना विशेष सहाय्य मिळवून देणार- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या