‘…कच्च्या गुरूचा चेला नाय मी’; महिलांसोबत गैरवर्तणाच्या आरोपांवर किरण मानेंची प्रतिक्रिया
मुंबई | स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढल्यापासून वाद-विवाद पहायला मिळत आहे. राजकीय भूमिका घेतली म्हणून मालिकेतून काढलं असल्याचा चर्चाहोत असताना आता स्टार प्रवाह वाहिनीने याविषयी पत्रक जारी करत किरण माने यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.
किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः मालिकेतील महिला कलाकारांशी केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला असल्याचं वाहिनीने म्हटलं आहे. अशातच वाहिनीने केलेल्या या आरोपांवर किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वाहिनीनं केलेल्या आरोपांनंतर किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुम्ही ठरवा. मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी.
आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे… करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्रोडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच.
थोडक्यात बातम्या –
किरण माने प्रकरण: “महिलांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढलं”
Omicron मधून बरं झाल्यानंतर शरिरात ‘इतका’ कालावधी अँटीबॉडीज राहतात, तज्ज्ञांचा इशारा
ऑनलाईन पिझ्झा मागवणं पडलं महागात, महिलेला बसला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा गंडा
‘या’ ठिकाणी मास्क घालण्यात हलगर्जीपणा, पोलिसांनी आकारला तब्बल एवढा दंड
चिंताजनक! कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण
Comments are closed.