“मी आमदार खासदार जन्माला घालणारा माणूस, त्यामुळे तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी…”
मुंबई | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावण्याचे काम केल्यानं त्यांचे आडनाव आगलावे करा, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि सदाभाऊ खोत यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे.
अमोल मिटकरींना माहिती नाही, मी आमदार खासदार जन्माला घालणारा माणूस आहे. त्यामुळे तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. बाजारू भाषण करायची. त्यामुळे सदाभाऊ सुपारी बहाद्दर नाही. तुम्ही सुपारी ढोलताशा वाजवणारे बँडबाजावाले आहात. त्यामुळे तुमच्या वक्तव्याला महत्त्व द्यावं की नाही?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला.
सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील याचं देखील नाव घेतलं आहे. वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसला याचा अभ्यास अमोल मिटकरींनी करावा. अमोल एक चांगला वक्ता आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र, अमोलने राजकारणाच्या गटारगंगेत आपल्या वक्तृत्वाची तलवार चालवू नये, अशी अपेक्षा सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांची आमदारकी जात आहे. त्यामुळे आमदारकी टिकवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात घरा घरात आग लावण्याचं काम भाजप करत आहे. हे अवघ्या देशाला माहिती आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले होते.
थोडक्यात बातम्या-
Corona: कोरोनाच्या वाढत्या शिरकावामुळे ‘या’ ठिकाणी चिंतेचं वातावरण
“काही वर्षांपूर्वीच कोकणातील घाण आपण पळवून लावली”
‘आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला’; अन्यथा…
जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! फक्त 10 रूपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड वॅलिडिटी आणि…
सर्वात मोठी बातमी ! आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात
Comments are closed.