Top News राजकारण

माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे- उद्धव ठाकरे

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेड आणि कांजूरमार्ग यासंदर्भात विरोधकांना चांगलंच प्रत्युत्तर दिलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “मेट्रो कारशेडच्या विषयावरुन सध्या थयथयाट केला जातोय. मात्र माझ्या मुंबईबद्दल मी अहंकारी आहे. माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे.”

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन राज्याचं होणारं नुकसान सांगितल होतं. शिवाय उद्धव ठाकरेंना अहंकारी असं संबोधलं होतं. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“आरेला केवळ मेट्रो 3ची लाईन होणार होती. मात्र आता कांजूरच्या ठिकाणी मेट्रो 3, 4 तसंच 6 या तीन लाईनचं कारशेड करू शकतो. पुढच्या 50 वर्षांच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आलंय. त्यामुळे आता आम्ही करतोय, ते अहंकार आहे की कर्तव्य हे आता तुम्हीच सांगा,” असंही मुख्यमंत्री म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

सातारच्या पाटलानं पटवली ‘कश्मीर की कली’; ‘हा’ अडथळा दूर होताच उडवला बार!

शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत- चंद्रकांत पाटील

महाविकासआघाडीतील अंतर्गत पक्षांतरावर छगन भुजबळ म्हणाले…

लवकरच भाजपला मोठी गळती, भाजपचे काही आमदार राष्ट्रावादीच्या वाटेवर- नवाब मलिक

“… तर 1000 कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या