बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी सीबीआयशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता”

मुंबई | वारंवार स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत हायकमांडने तातडीने बोलावून घेतलं. पक्षाचे प्रभारी आणि सरचिटणीस एच. के. पाटील तसेच के. सी. वेणुगोपाल यांच्यासमवेत दीर्घ बैठक झाली.

वेणुगोपाल यांनी नाना पटोले यांना दिल्लीत बोलावून घेतलं. सोनिया गांधी यांची तीव्र नाराजी या दोन्ही नेत्यांनी पटोले यांना सांगितली. त्यानंतर पटोले यांनी या विषयावरून यू-टर्न घेतल्याचं कळतंय. मुंबईत उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सरकारमध्ये असणारे मंत्री आणि आपल्या तिन्ही पक्षातील नेत्यांच्या मागे सीबीआय, ईडी यांचा ससेमिरा लावला जात आहे. असं असताना जनतेत तिन्ही पक्षांच्या ऐक्याचा संदेश कसा जाणार?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांकडे केला होता.

मी ईडी आणि सीबीआयशी लढत आहे, आणि तुम्ही माझ्याशीच लढण्याच्या गोष्टी करता? हे कितपत योग्य आहे? अशाने सरकार कसे चालेल?, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.

थोडक्यात बातम्या-  

‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

‘हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील पण…’; खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा; आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

‘कर नाही, तर डर कशाला’; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला

जे आहे मराठा समाजाचे खणखणीत नाणे, त्याचं नाव नारायण राणे- रामदास आठवले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More