नागपूर | मी दादा किंवा ताईमुळे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
तुम्ही दादा आणि ताईमुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळवल्याची चर्चा आहे. त्यामुळे तुम्ही दादागिरीला घाबरत नाही. हे खरं आहे का?, असा प्रश्न ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी विचारला होता. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी हे उत्तर दिलं.
मी दादा किंवा ताईमुळे नाही तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांमुळे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो आहे, असं उत्तर यावेळी जयंत पाटलांनी दिलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!
-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल
-सरकार शेतकरी नेत्यांचे फोन टॅप करत आहे; राजू शेट्टींचा आरोप
-रायगडावर बीडच्या वृद्ध जोडप्यानं अनुभवला रितेशचा दिलदारपणा!
-खड्डे बुजवतोय म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकावर कारवाई!!!