बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी काही उत्कृष्ट काम करत नाही, सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला – नितीन गडकरी

वर्धा | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर देत पंतप्रधान कार्यालय काही कामाचं नसून कोरोनाविरोधातील लढ्याचं नेतृत्व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे द्यावं, अशी मागणी केली. यावर नितीन गडकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी काही फार महत्त्वाचं काम करत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम करणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्वच सरकारी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आपणही सर्वांनी सर्व मतभेद विसरून सामाजिक जबाबदारीतून काम करायला हवं, असं नितीन गडकरी म्हणाले.

वर्धा येथील जेनिटिक लाईफ सायन्सेस येथे भेट दिल्यानंतर नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व करण्याविषयीच्या सुब्रमण्यम स्वामींच्या मागणीवर थेट बोलणं टाळलं.

दरम्यान, सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला आहे. सध्या जात, धर्म, भाषा, पक्ष मध्ये न आणता सर्वांनी मानवतेच्या आधारे सेवा केली पाहिजे. सर्व लोक करत असून आपणही त्यात थोडे प्रयत्न करत आहोत, असं गडकरींनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता गोमूत्र प्या, तुम्हाला कोरोना होणार नाही”

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन; फक्त या सेवा सुरू राहतील

“नितीन गडकरींकडे जबाबदारी देण्यामागची सुब्रमण्यम स्वामींची तळमळ समजून घ्या”

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक; मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनाने वडिलांचं निधन; अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर कुटुंबाने उचललं धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More