बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही’; अजित पवार संतापले

पुणे | ओबीसींच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच याता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी ओबींसींच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन आता त्यांच्यावर टीकांचा भडीमार होत आहे. अशातच आव्हाडांच्या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी ओबींसींच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न केला होता. मात्र यावरुन अजित पवार चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मी माझी मतं स्पष्टपणे सांगण्यासाठी केव्हाही तयार असतो. त्याचा अनुभव सर्व पत्रकार घेत असता. त्यांनी काय म्हटल हे तुम्ही त्यांनाच विचारत चला, असं अजित पवार यांनी म्हटलं.

ओबीसी मुद्दा महाराष्ट्र पुरता राहिलेला नाही, त्यामुळे कोणीही राजकारण करू नये, असं अजित पवार यांनी म्हटलं. अशातच ओबीसींच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ पहायला मिळत आहे.

दरम्यान, ओबीसींवर माझा फार काही विश्वास नाही, कारण जेव्हा मंडळ आयोग आलं तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं, असा घणाघात आव्हाडांनी ओबीसींवर केलेला पहायला मिळाला.

थोडक्यात बातम्या – 

Omicron नंतर ‘या’ नव्या व्हेरियंटचा शोध, ओमिक्रॉन, कोरोनापेक्षाही भयावह

Corona: केजरीवालांना कोरोना होताच दिल्लीत केली ‘ही’ मोठी घोषणा

अंगावर काटा आणणारा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा व्हिडीओ

“जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार”

ओबींसींबाबत जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More