पुणे | शनिवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे 10 मार्चला निकाल येणार आहेत. सदर पाच राज्यांमध्ये कोणाची सत्ता येईल?, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावरून शरद पवारांनी जोरदार टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना ज्योतिषाचं काम घ्यावं, इतकी माझी वाईट अवस्था झाली नाही. मी काही ज्योतिषाचं काम घेतलं नाही, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशात 7 मार्चला शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. 10 मार्चला निकाली येणार आहेत. यावर भाष्य करणं शरद पवारांनी टाळलं आहे.
शरद पवारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल देखील काही प्रश्न विचारण्यात आला होता. हे राज्यपाल आल्यानंतर अनेक प्रकार घडले. महाराष्ट्रात यापुर्वी सी प्रकाश हे राज्यपाल होते. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. राज्याचे राज्यपाल सी प्रकाश यांचं त्यावेळी देशात आणि देशाबाहेर नावलौकिक होता. अशा राज्यपालांमध्ये हल्लीच्या राज्यपालांच नाव ऐकायला भेटत नाही, असा टोलाही शरद पवारांनी लगावला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या कामाची पातळी घसरतेय, ते कुठपर्यंत घसरत गेलेत याची अनेक उदाहरणे आहेत. त्याची ही कामगिरी महाराष्ट्रात पहायला मिळत आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेचे सभापती नेमण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. वर्ष होऊन गेलं तरी नियुक्त्या नाहीत. त्यावर भाष्य न केलेलं बरं, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“…मग राणेंना अटक झाली तेव्हा त्यांचा राजीनामा का घेतला नाही?”
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे भाव
मोठी बातमी! मायदेशी परतण्यासाठी नागरिकांना वाट मोकळी, रशियाने घेतला मोठा निर्णय
मेडिकल शिक्षण घेणाऱ्यांसाठी आनंद महिंद्रांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“खेल आपने शुरू किया है, खत्म हम करेंगे”
Comments are closed.