बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही, त्याचं मला फार दु:ख वाटत नाही”

मुंबई | राज्यात शिवसेना आणि भाजपची मुख्यमंत्रीपदावरून युती तुटली होती. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. भाजपला सत्तेतून पायउतार होऊन विरोधी बाकांवर बसाव लागलं. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही त्याचं मला दु:ख नाही, असं वक्तव्य केलं आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. सत्तेत जनता असली पाहिजे. सत्तेत नाही याचं मला दु:ख नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी कोणत्याही पदावर नाही माझ्या हातात असतं तर शेतकऱ्यांना मदत केली असती, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सत्तेत खुर्चीवर कोण व्यक्ती आहे याला महत्त्व नाही. तसेच ज्या मागण्या सरकारकडे करते त्यातील प्रत्येक मागणी व्यावहारिक असते, असं पंकजा यांनी सांगितलं. जातीभेदावर भाष्य करताना पंकजा मुंडे यांनी जातीपातीत भिंती पाडण्यासाठी मी कधीचं काही मागत नाही, असं म्हटलं आहे.तसेच मी मंत्री झाल्यावर जेव्हा काम केलं तेव्हा सर्व आठवणीत ठेवून काम केलं, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना जनता त्रस्त आहे. महाराष्ट्रात जे काही राजकीय चित्र दिसतंय ते फार उत्साहवर्धक नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. विरोधी पक्ष सक्षम असेल तर जनता सुखी राहते, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला उच्च न्यायालयाचा दणका

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

“भारतीय नागरिक आरएसएसमुळेच सुरक्षित, त्यांच्यामुळे देशाला शांती लाभली”

मोठी बातमी! अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या सुरक्षेत मोठी वाढ 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More