देश

भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांवर सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा खुलासा

चेन्नई |  सुपरस्टार रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून झडत आहेत. यावरच खुद्द रजनीकांत यांनी खुलासा केला आहे. मी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काही माध्यमं आणि काही लोकं माझा भगवीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच हा प्रयत्न त्यांनी थांबवायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते पोन राधाकृष्णन यांची रजनीकांत यांनी भेट घेतली होती. त्यानंतर रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

भारतीय जनता पक्षाने देखील असा दावा कधी केला नाही की रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात पक्षाचं कोणतंही आमंत्रण नाही. मला भाजपच्या भगव्या रंगामध्ये बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र मी यामध्ये मी अडकणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

अयोध्येच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या