औरंगाबाद महाराष्ट्र

अशोक चव्हाण म्हणतात…’मी हिरोपेक्षा काही कमी नाही’

नांदेड | जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजकांनी क्रिकेट स्पर्धेसाठी एखाद्या अभिनेत्याला आणा अशी विनंती केली होती. यावर चव्हाण यांनी मजेशीर उत्तर दिलं आहे.

तुम्ही मला कोणत्या तरी अभिनेत्याला घेऊन या असं सांगत आहात. अभिनेत्रीलाही घेऊन या असं तुम्ही सांगाल. आपण अभिनेता आणि अभिनेत्री दोघांना आणण्याचा प्रयत्न करु. पण मी हिरोपेक्षा काही कमी नाही, फक्त राजकारणात असल्याने मला ते दाखवता येत नाही, असं ते म्हणाले आहेत.

मॅचमध्ये तुम्ही चांगला स्कोर करा, काळजी करु नका. तुमचा गौरव करण्यासाठी, तुम्ही चांगली कामगिरी करत असताना तुम्हाला प्रोत्साहन देण्याकरता ज्यांना आणायची गरज आहे त्यांना आणू, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी हास्याने प्रतिसाद दिला.

ट्रेंडिंग बातम्या-

सीएएमध्ये गैर काय आहे? माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय- राज ठाकरे

केंद्र सरकारला सांगतोय, पोलिसांना फक्त 48 तास द्या, मग बघा…- राज ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

‘मी पुन्हा येईन’ नंतर देवेंद्र फडणवीसांचा ‘आपण येतोच’चा नवा नारा!

इथल्या मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाहीत- राज ठाकरे

“भाजपच्या ‘धार्मिक-द्वेष एक्स्प्रेस’ करिता मनसेने इंजिन भाड्यावर दिलंय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या