बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुमच्यामुळे जबाबदारी मिळाली आहे, मी जबाबदारीतून पळणारा नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | माझी बदललेली जबाबदारी तुम्ही पाहतच आहात. ही जबाबदारी मला तुमच्यामुळे भेटली असून मी या जबाबदारीतून पळून जाणारा नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मार्मिक वर्धापन दिनाच्यानिमित्त मुंबईमधील सोहळ्यात बोलत होते.

भाषण करायची सवय आता जात चालली आहे. सभेची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो अशी व्हायची. या शिवाय सुरुवात होऊच शकत नाही. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे अशा प्रणालीद्वारे आपण भेटत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं शुक्लकाष्ट मागे लागलं आहे. त्यामुळे आपण कार्यक्रम असा साजरा करत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी माणूस लढ्यासाठी कधी मागेपुढे पाहत नाही. कुणी अन्याय करत असेल तर त्याच्या छाताडावर पाय देण्याची हिम्मत मराठी माणूस दाखवतो. ही हिम्मत आजही आहे, कालही होती आणि उद्याही असणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यासोबतच उद्धव ठाकरेंनी मार्मिकबाबत आणीबाणीच्या काळात मार्मिक कसं सुरू होतं?, याबाबत माहिती दिली.

दरम्यान, आणीबाणीच्या काळात मार्मिकवर बंधन नव्हतं पण मार्मिकच्या प्रेसला टाळा होता. त्यावेळी मार्मिक छापण्यासाठी कोणी तयार नव्हतं. वितरणाची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नव्हतं. मात्र त्यावेळी दिवाकर रावते हातगाडीवरून मार्मिक बाजारात घेऊन जात होते. हे सगळे साथी मार्मिकने उभे केले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

आमदार अशोक पवारांच्या ‘एक हात मदतीचा’, आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद; 28 ट्रक कोकणाकडे रवाना!

“शरद पवारांना करायचं काहीच नसतं फक्त भावल्या नाचवायच्या असतात, राहुल गांधींना लवकरच कळेल”

पुण्याच्या ‘या’ गावात महिलांना पुढचे 3 महिने गरोदर न राहण्याच्या सूचना!

राज्यपालांना परिस्थिती आणि जबाबदारीचं भान असावं – मुंबई उच्च न्यायालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More