…तोपर्यंत मी निवृत्ती घेणार नाही- गौतम गंभीर

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज गौतम गंभीरने 37 व्या वर्षात पदार्पण केलं. त्याच्या वयावरून तो क्रिकेटमधून निवृत्त होणार की काय?, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र गौतमने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यावर पुर्णविराम दिला आहे.

जोपर्यंत मी चांगला खेळतो आहे, धावा काढतो आहे तोपर्यंत मी नक्कीच निवृत्ती स्विकारणार नाही, असं गंभीरने स्पष्ट केलं आहे. 

प्रत्येक सामन्यात धावा काढल्यानंतर तुम्ही संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलता तो आनंद काही औरच असतो. जोपर्यंत माझ्यात ही आवड कायम आहे, तोपर्यंत मी निवृत्ती नक्कीच स्विकारणार नाहीये, असं त्यानं सांगितलं. 

दरम्यान, 2007 साली झालेला टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 चा विश्वचषकमध्ये भारताच्या विजयात गंभीरचा मोलाचा वाटा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-चोर तो चोर पोलिसांवर शिरजोर; मनसे कार्यकर्त्यांचा मोर्चा

-…म्हणून राधाकृष्ण विखे-पाटलांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

-राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोलिस तक्रार!

-‘मी टू’ विकृत मनाच्या लोकांनी सुरू केलेली मोहीम; भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

-महिलांनी मंदिरात प्रवेश केला तर टाळं ठोकू; पुजाऱ्याचा इशारा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या