बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे”

कोल्हापूर | अतिवृष्टी व पुराच्या पार्श्वभुमीवर आज राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते कोल्हापुरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी झाल्यानंतर स्वतंत्र पत्रकार परिषदही घेतली.

दरम्यान, विरोधी पक्षाकडुन सरकारने पॅकेज जाहीर करावं, असं सांगण्यात येत होतं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. “मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे”, असं पत्रकारांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सत्ताधारी व विरोधकांमध्ये आज वाकयुद्ध रंगल्याचं दिसुन आलं. मुख्यमंत्र्याना उद्देशुन देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांना मदत मिळणं आवश्यक असून मुख्यमंत्र्यांनी त्याला पॅकेज किंवा घोषणा काहीही म्हणावं, असं म्हटलं आहे. त्यामुळे आता या मुद्यावरून पुन्हा एकदा सरकार विरूद्ध विरोधी पक्ष अशी लढाई जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नसल्याचं यापुर्वीच स्पष्ट केलं होतं. त्यातच आता कोल्हापुरात पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीचा पुनरूच्चार केला आहे. सरकारच्या मदतीकडे व मदतीसाठी वापरण्यात येणाऱ्या निकषांकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

सलग तीन दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

फुकट बिर्याणी पुुण्यातील महिला डीसीपींच्या अंगलट; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

CBSE बारावीचा निकाल जाहीर; परंपरा कायम ठेवत मुलींनीच मारली बाजी

Maharashtra HSC Result 2021 : ऑगस्टमध्ये जाहीर होणार बारावीचा निकाल

शरद पवार आणि नितीन गडकरींची दिल्लीत भेट; चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More