बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पर्यटन विभागाचा मंत्री माझा मुलगा, आदित्य ठाकरेचा मला अभिमान – उद्धव ठाकरे

मुंबई | आज जागतिक पर्यटन दिन आहे. महाराष्ट्राला पर्यटनाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यानिमित्ताने राज्याच्या पर्यटन विभागाकडून एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी महाविकास आघाडी सरकारचं आणि प्रशासनाचं कौतूक केलं आहे. त्यावेळी त्यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचं खास कौतूक केलं.

आगामी काळात पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे काम करण्याची गरज आहे. राज्यात पर्यटन विभागाला काहीही कमी पडू देणार नाही. राज्य सरकार आणि अर्थखातं त्यांच्या पाठिशी आहे. पर्यटन विभागाचा मंत्री माझा मुलगाच आहे आणि आदित्य ठाकरेचा मला अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे या कार्यक्रमात म्हणाले आहेत.

कोरोना काळात निर्बंध असताना देखील पर्यटन विभागाने नवीन धोरण आणलं आणि नवीन उपाय योजना केल्या, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. डेक्कन ओडीसीमध्ये मंत्रीमंडळाची बैठक घेणार पण या बैठकीची जबाबदारी थोरात साहेब आपली असेल. आपण पोहचून परत निघालो तरी बैठक संपायची नाही. त्यामुळे आपली पंचायत होईल, असंही मिश्किल टिप्पणी देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

दरम्यान, शेवटी बोलणाऱ्याची पंचायत होते. शेवटी कॅप्टनला मैदान साफ करावं लागतं. आपण मॅच जिंकल्याचा आनंद नक्कीच आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पंकजा मुंडेंना मोठा धक्का! ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे भाजप नेत्यांच्या अडचणीत वाढ

“महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?, आरोग्य भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख मागितले”

भाजप-मनसे युतीचा श्रीगणेशा! ‘या’ जिल्ह्यात अखेर युतीची अधिकृत घोषणा

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्याने ठोकला काँग्रेसला रामराम

“देशात ‘ही’ नवी पद्धत आलीये, काहीजण सुुपारी घेऊन काम करतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More