“महाराष्ट्राच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी आहे”; मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य
मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या सध्या काही प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
तिसर्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याने महाराष्ट्रात बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. याच टास्क फोर्सच्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात सध्या 1 जूनपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
1 जून नंतरही महाराष्ट्रातील लॉकडाऊन कायम राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हितासाठी मी लॉकडाऊनचं पाऊल उचललं आहे. तसेच महाराष्ट्राच्या हितासाठी कटूपणा घ्यायचीही माझी तयारी आहे, तसं मी नेहमी सांगतो. त्यानुसारच, मला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आणि हा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांनी खरोखरच त्याला मनापासून सहकार्य केलं. त्यातूनच आज कोरोनावर नियंत्रण मिळवता आलं आहे. पण अजून या लढाईत पूर्णपणे यश मिळालेले नाही, ते यश मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 1 जून नंतरही वाढवला जाणार अशा चर्चांना उधाण आलं असतानाच मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार की नाही? हे स्पष्ट होईलच पण सध्या त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
थोडक्यात बातम्या –
दिलासादायक! मुंबईतील सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी
11 हजारांसाठी रुग्णालयाने ठेवून घेतलं महिलेचं मंगळसूत्र; माणुसकीला काळीमा फासणारी घटना
पुण्यातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट; कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! आयपीएलचे सामने आता ‘या’ देशात खेळले जाणार; BCCI करणार घोषणा?
कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिल्याने पुण्यातील प्रेमीयुगुलाने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल
Comments are closed.