बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी पुराव्यांसह सांगतोय, कोरोनामुळे झालेल्या मृत्युसाठी मोदीच जबाबदार- असदुद्दीन ओवैसी

मुंबई | कोरोनाने जगभर थैमान घातलं होतं. सध्या जगातील अनेक देशात कोरोना स्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. परंतू भारताला सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. या दोन लाटेमध्ये अनेक भारतीयांना जीव गमवावे लागले आहेत. यावरून आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे.

मी पुराव्यांच्या सहाय्यानं बोलत आहे. जेव्हा सर्व डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी सांगितलं होतं की कोरोनाची दुसरी लाट येणार आहे, त्यावेळी योग्य त्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सल्ला ऐकला नाही आणि आपल्या मर्जीनुसार निर्णय घेतले. भाजपनं प्रस्ताव पारित करत पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. या सर्वांची जबाबदारी पंतप्रधानांची आहे, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

ऑक्सिजनची जबाबदारी ही पंतप्रधानांवर आहे. ऑक्सिजनसाठी उच्च न्यायालयात जावं लागलं. पंतप्रधानांची अकार्यक्षमता मोदींचे भक्त प्रशासनावर ढकलत आहे. साडेचार महिन्यांत देशाच्या लोकसंख्येतील केवळ 3.2 कोटी लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आणि 16 कोटी लोकांना एक डोस मिळाला. अशात तिसरी लाट आली तर काय होईल?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, याआधी त्यांनी लसीकरणाच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसत असल्यानं पुरेशा प्रमाणात लस पुरवठा होत नाही. त्यामुळे राज्यांकडून लसीकरण केंद्र बंद केली जात आहे, अशा आरोप त्यांनी यापुर्वी देखील केला होता.

थोडक्यात बातम्या-

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

‘या’ राज्याने 12 वीच्या बोर्डाची परीक्षा केली रद्द; विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची- मुख्यमंत्री

दोन चित्रपटांनंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन बाहेर; मेकर्सनं केला खुलासा, म्हणाले…

“भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय”

डान्सर राघव जुयाल कोरोनाग्रस्तांची करतोय मदत, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More