महाराष्ट्र मुंबई

मला माफ करा, पण त्याशिवाय पर्याय नव्हता- उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोना व्हायरसला पराभूत करण्यासाठी लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वेळेबरोबर सगळया गोष्टी सुरळीत होतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.

घरी असताना लोक वेगवेगळया समस्यांचा सामना करतायत, लोक कंटाळले आहेत हे मी समजू शकतो. पण COVID-19 ला पराभूत करण्यासाठी घरी थांबण्यावाचून पर्याय नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

कोरोना व्हायरसचा जिथून प्रसार झाला ते वुहान आता पूर्वपदावर येत असल्याचं मला वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजलं आहे. तिथे निर्बंध उठवले आहेत ही चांगली गोष्ट आहे. वेळेबरोबर सर्वगोष्टी सुरळीत होतील असाच त्याचा अर्थ होतो, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, ज्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असतील त्यांनी खासगी दवाखान्यात न जाता क्युअर क्लिनिकमध्ये जावे. प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. त्याची माहिती देण्यात येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

“राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1135, महाराष्ट्र अद्याप स्टेज 3 मध्ये नाही”

‘माझ्यावर प्रेम असेल तर एवढचं करा…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच आवाहन

महत्वाच्या बातम्या-

“काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्या”

‘बाहेरचा आला नी धमकावून गेला’; ट्रम्प यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्री संतापली

पुण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आठ जणांचे बळी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या