बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी आजही हिंदूच, आईची इच्छा होती म्हणून मी…”

मुंबई | आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. अशातच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो व्हायरल करत वानखेडे मुस्लीम असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी मलिकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.

समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामा खरा असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर नवाब मलिकांनी कोणाच्याही खासगी आयुष्यात डोकावू नये, असा सल्ला देखील ज्ञानदेव वानखेडे यांनी दिला होता. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

आमचा विवाह मुस्लीम पद्धतीने व्हावा, अशी माझ्या आईची इच्छा होती. विशेष विवाह कायद्यांर्गत माझ्या विवाहाची नोंद केली असल्याचं देखील समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. मी जन्माने हिंदू असून, मी दलित कुटुंबातील आहे. मी आजही हिंदूच आहे आणि मी कधीही धर्मांतर केलेलं नाही, असंही वानखेडे म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्ही कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेतला आहे. मी धर्मांतर केले असतील तर मलिकांनी त्याचे पुरावे दाखवावे, असं आव्हान देखील समीर वानखेडे यांनी दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वानखेडे मलिक वादा आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

समीर वानखेडे यांचा निकाह लावून देणारे मौलाना आले समोर; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला अखेर ठाकरे सरकारचा हिरवा कंदील

पंजाबमध्ये राजकीय खळबळ; अमरिंदरसिंग यांनी केली महत्त्वाची घोषणा

भाजपला मोठा धक्का! भाजपचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

यंदाच्या दिवाळीत अमृता फडणवीस चाहत्यांना देणार सुरेल दिवाळी गिफ्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More