बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी जगातील सर्व काश्मीरी नागरिकांचा ब्रँड अॅम्बेसिडर”

नवी दिल्ली | भारत पाकिस्तानचे संबंध अनेक वर्षांपासून तणावाचे आहेत. भारत पाकिस्तान सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन यामुळे दोन्ही देशांमधील संबंध खराब राहिले आहेत. मात्र या सगळ्याला आरएसएसची विचारसरणी मध्ये येत असल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांनी काश्मिरचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे.

संसदेत कायदा करून केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्यात आलं होतं. काश्मीरमधून कलम 370 हटवण्यावरून इम्रान खान यांनी सरकारच्या निर्णयाची निंदा केली आहे. 5 ऑगस्ट 2019 नंतर काश्मीरमध्ये अत्याचार वाढला, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. तसेच, मी जगातील सर्व काश्मीरी नागरिकांचा ब्रँड अॅम्बेसिडर असल्याचा पोकळ दावा त्यांनी केलाय.

कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला सरकारनं मागं घ्यावं, यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये चर्चे होऊ शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे. याआधी त्यांनी आरएसएसवर निशाणा साधला होता. भारताला आम्ही सांगू शकतो की गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही वाट पाहतोय सभ्य शेजारी बनून राहण्याची पण काय करणार आरएसएसची विचारसरणी मध्ये आली, असं इम्रान खान म्हणाले होते.

दरम्यान, एखाद्या महिलेने फार कमी कपडे घातले असतील तर त्याचा पुरुषांवर परिणाम होतो. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ महिलांच्या कपड्यांशी संबंधित असल्याचा जावई शोध त्यांनी लावला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची जगभरात बदनामी झाली होती.

थोडक्यात बातम्या-

अमिताभ बच्चन की सोनू सूद?; फोटो पाहून चाहतेही पडले गोंधळात, पाहा फोटो

“आम्ही दिवा स्वप्न पाहत नाही, आमचं स्वप्न 2024ला पूर्ण करू”

“लोक पावसामुळे मेली तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत”

गब्बर सेनेकडून लंकादहन; 7 गडी राखून भारताचा श्रीलंकेवर दमदार विजय

‘…तेव्हा वडिलांच्या औषधांसाठीही पैसे नव्हते’; वडिलांच्या आठवणीत नाना भावूक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More