बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीकरणात महाराष्ट्राने मारला टॉप! देशात 3 कोटी लसीकरण करणारं पहिलं राज्य

मुंबई | कोरोनाने देशात थैमान घातलेलं होतं. या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना लस घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरूवात झाली. लसीकरणात महाराष्ट्राने या लसीकरणाच्या घोडदौडेत  अव्वल क्रमांक पटकवला आहे.

महाराष्ट्रात आज दुपारी दोन वाजेपर्यंत 3 कोटी 27 हजार 217 नागरिकांना लशींच्या मात्रा देऊन त्यांना संरक्षित करण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात करोना संसर्गाचा स्फोट झाला होता. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लसीकरणाची मोहीम वेगाने वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्राने लसीकरणात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण कमी आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अभिनंदनही केलं आहे.

दरम्यान, राज्यातील 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. उद्यापासून 18 वर्षाच्या वरील नागरिकांना सरसकट लसीकरण केलं जाणार असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

‘किस करणं मराठी अभिनेत्रींना शोभतं का?’, ट्रोलर्सना तेजस्विनी पंडितचं उत्तर

“आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश”

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीवरून शरद पवारांची पाटलांवर टीका; म्हणाले…

“ईडी आम्हाला नवीन नाही त्यामुळे देशमुखांवरील कारवाईबाबत आम्हाला यत्किंचितही चिंता नाही”

“देशमुखांवरील कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार, संजय राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More