बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मी अस्पृश्य, पण संभाजीराजेंबरोबर जायला तयार”

अहमदनगर | न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते महाराष्ट्र दौऱ्यावर होते यामध्ये त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली. शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला 6 जूनपर्यंत अल्टिमेट दिला आहे. त्यानंतर शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचं नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे भोसले यांनी भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आपण संभाजीराजेंसोबत असल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांची भेट घ्यायची होती, ती आज झाली. यापूर्वी देखील आम्ही अनेकवेळा भेटलो आहे. पण भेट घेण्याचं एकच कारण ते म्हणजे जातीय विषमता कमी करता येईल. बहुजन समाज एकाच छताखाली राहिल. मला शाहू महाराजांचा आणि त्यांना प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

‘…त्यावेळी संभाजीराजेंनी तोंड का उघडलं नाही?’; बी.जी. कोळसे पाटलांची संभाजीराजेंवर टीका

विवाहीत प्रियकराला घरी बोलावून त्याचीच केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

अरे बापरे! नवरदेवाला हळद लावण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

कुलूप लावलेल्या घरात पत्नीनं पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं पुढे झाला हाय होल्टेज ड्रामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More