देश

मी आज अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

नवी दिल्ली | मी आज अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे. आपण गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात कोरोना विरोधात लढाई लढत आहोत. कोरोना विरोधातील लढ्यात ही लस संजीवनी म्हणून काम करेल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलंय.

जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा आजपासून शुभारंभ झाला. यावर हर्षवर्धन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपण या अगोदरही पोलिओ आणि कांजण्यासारख्या आजारांना नष्ट केलं आहे. भारताकडे अशाप्रकारच्या संकटांना सामोरं जाण्याचा बराच अनुभव आहे. हे कदाचित जगातील सर्वात मोठी लसीकरण अभियान आहे, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

देशातील कोविड योद्ध्यांचे सर्वप्रथम लसीकरण करण्यात येत आहे. त्यात आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे.

थोडक्यात बातम्या-

महादेवावर नितांत श्रद्धा असलेल्या मुस्लिम शेतकऱ्यानं स्वखर्चातून उभारलं महादेवाचं मंदिर!

“आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे बाहेर येतील”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अंबानी-अदानीसाठी काम करत आहेत”

“आदित्य ठाकरे म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असणारा खरा नातू”

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत गुंडगिरी करून माझ्या पक्षाचं नाव खराब करत आहेत- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या