बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी ठाकरे सरकार आणि नवाब मलिकांना इशारा देतोय की…”

मुंबई  | मुंबईतील क्रुझवर केलेल्या कारवाईनंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सध्या चर्चेत आहे. आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर या वादात आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ठाकरे सरकारचे नेते ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते असल्यासारखं बोलत आहेत. एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्याविरोधात नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरूद्ध दुर्भावनापूर्ण जी मोहिम उघडलीय, त्याचा मी निषेध करतो, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

मी ठाकरे सरकार आणि नवाब मलिक यांना इशारा देतोय की, समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्राची जनता त्या माफियाला सोडणार नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, एकीकडे एनसीबीवर आरोप करत असताना मला राजस्थानमधून धमकीचे फोन येत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे राज्याचं वातावरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे. अशातच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नवाब मलिक यांना संरक्षण देणार असल्याचं देखील सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ठरलं तर! अचानक रद्द झालेला ‘तो’ निर्णायक कसोटी सामना पुढच्या वर्षी होणार

‘गिरीश महाजन यांना पैशांचा घमंड असल्यानं…’; रोहित पवारांची घणाघाती टीका

“…तर मी स्वत: अशोक चव्हाण यांचा जाहीर सत्कार करेन”

कोंबड्यांमुळे नवा व्हायरस पसरण्याची भीती; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

1975 नंतर पावसाचा नवा विक्रम! ‘या’ कारणामुळे थांबला परतीचा पाऊस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More