Top News

लॉकडाऊनसारख्या कठोर निर्णयांबाबत देशाची माफी मागतो- पंतप्रधान

Loading...

मुंबई |कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो. अनेक लोकांच्या गैरसोयी होत आहेत. हातावरचे पोट असलेले लोक मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउनचे नियम पाळून तुम्ही इतरांची मदत करत आहात असे नाही. तर लॉकडाउन पाळून तुम्ही स्वतःचीच मदत करत आहात हे लक्षात ठेवा. बाहेर पडून कुणालाही करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही ही काळजी घेत आहोत. जे लॉकडाउनचे नियम मोडतील त्यांना पश्चात्तापच होईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

करोनाशी लढाई करायची असेल तर लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयांशिवाय पर्याय नाही. करोना व्हायरससोबतची लढाई आपल्याला जिंकायची आहे. जगभरात करोनामुळे मृतांची संख्या वाढली आहे. हा नक्कीच चिंतेचा विषय असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.

दरम्यान, अनेक लोक माझ्यावर नाराज असतील, मी असा कसा निर्णय घेतला? हे असे कसे पंतप्रधान आहेत? असंही अनेकांना वाटलं असेल. मात्र कठोर निर्णयांशिवाय आपल्याकडे पर्याय नाही असंही मोदींनी म्हटलं आहे.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

चीनकडून जागतिक व्यवसायावर ताबा, मोठ्या कंपन्यांची हिस्सेदारी खरेदी

मुंबईत भाजप पोहोचणार 10 लाख गरजूंपर्यंत; अन्न-औषध वितरणाला प्राधान्य- फडणवीस

महत्वाच्या बातम्या-

रैना झाला सर्वात मोठा दिलदार! सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान

कोरोनामुळे ‘गोकुळ’ तोट्यात; घेतला ‘हा’ निर्णय

“मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाजचा अट्टाहास टाळावा”

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या