बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पैज लावून सांगतो देशात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही- राकेश झुनझुनवाला

नवी दिल्ली | देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यातच येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट देखील येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशातच गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि दलाल स्ट्रीटचे तसेच भारताचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात मोठा दावा केला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शेअर बाजारामध्ये मंदी येण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे. याचसंदर्भात बोलताना भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार नाही, असा दावा झुनझुनवाला यांनी केला आहे.

कोणीही दोन लाटांचं भाकित व्यक्त केलं नव्हतं. मात्र आता सगळेजण तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी करत आहेत. सध्या ज्या वेगाने लसीकरण सुरु आहे ते पाहता तिसरी लाट येण्याची शक्यता मला तरी वाटत नाही, असं, झुनझुनवाला यांनी आपलं मत मांडताना म्हटलं आहे.

दरम्यान, पुढे बोलताना झुनझनवाला यांनी म्हटलं की, लाट येवो अथवा न येवो भारतीय अर्थव्यवस्था ही कोणत्याही संकाटाचा सामना करण्यासाठी तयार आहे. तिसरी लाट येणार नाही यासाठी मी पैजेवर पैसे लावण्यासाठीही तयार आहे. सोशल मीडियावर सर्वच हुशार लोक तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करत असल्यानं आपण घाबरुन गेलो आहोत. आपण सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे.

थोडक्यात बातम्या – 

राहुल गांधींचा मोदी सरकारवर टीकेसाठी नाहीतर मदतीसाठी हात पुढे; म्हणाले…

“सरकार अधिवेशनापासून पळ काढतय, या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध”

“तेव्हाच्या पंतप्रधानांमध्ये आणि सध्याच्या पंतप्रधानांमध्ये ‘हा’ फरक आहे”

“…तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी सरकारला भीती”

एक नवा हास्यास्पद प्रयोग; शरद पवारांच्या घरी होणाऱ्या बैठकीवरुन भाजपचा टोला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More