बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पहिल्यांदा हेल्मेट घालून विकत घेतलं होतं कंडोम’, ‘या’ अभिनेत्यानं सांगितला मजेशीर किस्सा

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांचं मन जिंकत असतो. त्यानं अगदी कमी कालावधीत आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. नुकताच अपारशक्तीचा ‘हेल्मेट’ चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट कंडोमवर आधारित असून याविषयी बोलताना अपारशक्तीनं अनेक अनुभव शेअर केले आहेत.

मुलाखती दरम्यान अपारशक्ती खुरानानं सांगितलं की, काॅलेजमध्ये असताना मी कंडोमचं पहिलं पाकिट खरेदी केलं होतं. हेल्मेट न काढताच कंडोम खरेदी केलं आणि लगेचच तिथून निघून गेलो. मात्र तेव्हा कधीच असं वाटलं नाही की पुढे जाऊन मी यावरच चित्रपट करेेल.

अपारशक्ती खुरानानं पुढे गंमतीत म्हटलं की, खरं तर हा सिनेमा म्हणजे माझाच बायोपिक आहे, असं म्हणायला हरकत नाही. हेल्मेट थ्रिलर कॉमेडी चित्रपटात अपारशक्ती खुराना, प्रनूतन बहल आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

दरम्यान, अपारशक्ती खुरानाला दंगलमधून पहिल्यांदा ब्रेक मिळाला होता. त्यात त्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अनेकदा त्याच्या अभिनयाचं कौतूकही झालं. तो सहकलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करताना पाहायला मिळतो.

थोडक्यात बातम्या – 

‘रितेश देशमुखच्या मुलांनी म्हटली गणपतीची आरती, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

लसीचा एकही डोस न घेतलेल्या ‘या’ आमदाराचं कोरोनामुळे निधन!

राज्याला पुढील 4-5 दिवस पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी; अपघाताचा व्हिडीओ आला समोर

बाळू मामाचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसलेला अटक!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More